- प्रशासनाची भूमिका संशयास्पद? ठोस निर्णयाचा अभाव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ ऑगस्ट २०२१) :- शहरातील १८ मीटरपेक्षा अधिक रुंदीचे रस्ते यांत्रिकी पद्धतीने सफाई विषय महासभेमध्ये प्रशासनाने मांडला होता. मात्र हा विषय पुन्हा एकदा तहकूब करण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षांपासून या प्रस्तावाला मान्यता दिली जात नाही. मात्र वारंवार हा प्रस्ताव महासभेपुढे आणला जात आहे.
पिंपरी चिंचवड शहरामध्ये रस्त्यांची यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र, ही निविदा करत असताना अपुऱ्या माहितीचा घेतलेला आधार, गूगल मॅपद्वारे निवडलेले रस्ते व शेकडो कामगारांचा रोजगार या मुद्द्यांमुळे ही निविदा प्रक्रिया चर्चेचा विषय बनली होती.
याच मुद्द्यामुळे हा प्रस्ताव दफ्तरी दाखल करण्याची नामुष्की प्रशासनावर आली होती. हाच विषय पुन्हा एकदा सभापटलावर ठेवण्यात आला होता. या विषयाबाबत झालेल्या महासभेत विनाचर्चा हा विषय तहकूब करण्यात आला. वारंवार हा विषय तहकूब केला जात असूनही प्रशासन महासभेसमोर आणत असल्याने चर्चेला उधाण आले आहे.












