न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. ९ जाने.) :- भोसरी एमआयडीसी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून महावितरणचे डीपी बॉक्स धोकादायक अवस्थेत उघडे होते. परिसरातील नागरिकांची लहान मुले, तसेच मोकाट जनावरे आदींचा या परिसरात वावर असतो. त्यामुळे त्यांच्या जीवितास या उघड्या डीपी बॉक्समुळे धोका होण्याचा संभव होता. फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनच्या वतीने याबबत महावितरणाच्या अधिकाऱ्यांना भेटून कार्यवाही करण्याची मागणी केली होती. अन्यथा अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा इशारा दिला होता
असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांच्या पाठपुराव्यास यश आले असून, महावितरणाच्या प्रशासनाने या मागणीची दखल घेत एमआयडीसी परिसरातील उघडे डीपी बॉक्सना बंदिस्त करण्याची कार्यवाही करण्यास सुरुवात केली आहे. परिसरातील उद्योजकांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.
इंडस्ट्रीजच्या शेजारील डीपीला बऱ्याच वर्षापासून झाकणे नव्हती. अत्यंत धोकादायक परिस्थितीमध्ये होते. अभय भोर फोरमचे अध्यक्ष यांच्या प्रयत्नातून काही ठिकाणी डीपीला झाकणे लावण्यात आली. त्याबद्दल अभिनंदन. – शैलेश भोर (प्रोप्रायटर ग्लोबल सीएनसी सेल्स अंड सर्व्हिस)
भोर यांच्या प्रयत्नामुळेच माझ्या कारखान्या समोरील कित्येक महिने उघड्या डीपीचे झाकण बसवण्यात आले आहे. – आनंद कुलकर्णी उद्योजक











