- पुण्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत संभाजीराजे आक्रमक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ ऑगस्ट २०२१) :- ”दोन मिनिटांत महाराष्ट्र पेटवू शकतो पण आपल्याला ते करायच नाही”, संभाजीराजेंनी पुण्यामधील मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीमध्ये म्हटलं आहे ही लढाई संयमानेच लढली जाईल असं स्पष्ट केलं. मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाची भूमिका ही समांजस्याची असल्याचं संभाजीराजेंनी आपल्या भाषणात अधोरेखित केलं. यावेळी त्यांनी मतभेद विसरुन लोकं मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी एकत्र आल्याबद्दल समाधान व्यक्त केलं.
वर्षानुवर्षे जे लोक एकमेकांची तोंडं पाहत नव्हते ते आज या बैठकीच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. आपल्याला अशाच एकजुटीने लढायचं आहे आणि मराठा समाजाला न्याया मिळून द्यायाचा आहे, असं संभाजीराजेंनी या बैठकीमध्ये सांगितलं.
चहा प्यायला म्हणजे विषय संपला असे होत नाही. अजित पवार कोल्हापूरला घरी जाऊन भेटले त्यावेळी अनेकजण म्हणाले. महाराज मॅनेज झाले वगैरेही चर्चा सुरु झाल्या, पण ज्या दिवशी मॅनेज होईल त्या दिवशी घरी बसेल जाऊन छत्रपती असे नाही मॅनेज होणार माझ्यावर विश्वास ठेवा, अशा शब्दांमध्ये संभाजीराजेंनी या भेटीवरुन टीका करणाऱ्यांना सुनावलं.
आता काय करायचं? तुम्ही सांगा काय करायचं? दोन मूक आंदोलनं झाली तरी राजे शांत. महापूर आला म्हणून आम्ही थांबलो. दोन महिने झाले कोव्हिड परस्थिती सुधारते. पण तुम्ही मराठा समाजाचे एवढे आंदोलन झालं. त्यासाठी अजून एक आंदोलन करावे लागणार. आता नांदेडला एक मूक आंदोलन करू, असंही संभाजीराजे म्हणालेत. २० ऑगस्ट रोजी नांदेड येथे मूक आंदोलन होणार होणार असल्याची घोषणा या कार्यक्रमामध्ये मराठा क्रांती मूक मोर्चा समन्वयकांनी केलीय.
”माझी एकट्याची आझाद मैदानावर लाक्षणिक किंवा बेमुदत उपोषणास करण्याची माझी तयारी आहे. तुम्हीच ठरवा आणि सांगा,” असं संभाजीराजेंनी या बैठकीमध्ये सहभागी झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना आणि कार्यकर्त्यांना सांगितलं आहे.















