न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जाने.) :- राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद पुणे, भगवान महावीर शिक्षण संस्था भोसरी आणि बंधुता प्रतिष्ठान या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने भोसरी येथे विसाव्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे डॉ. श्रीपाद सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले होते.
यावेळी चिंचवड विधानसभा ब्लॉक काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष व स्व. राजीव गांधी प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष संदेशकुमार नवले यांना राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेच्या वतीने अतिशय प्रतिष्ठेचा ”भूमिपुत्र” हा पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. यावेळी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, संयोजक अशोक पगारिया, प्रकाश रोकडे, स्वागत अध्यक्ष प्रकाश जवळकर आदी उपस्थित होते.
गेली २० ते २५ वर्षे नवले हे पिंपरी चिंचवड शहराच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये वैधानिक कार्य करीत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेच्या वतीने त्यांना मनाचा ”भूमिपुत्र” हा पुरस्कार प्रा. माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.











