- चौघांवर चिंचवड पोलीस चौकीत गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ ऑगस्ट २०२१) :- रिक्षाला झटू नकोस असे फिर्यादीने सांगितले असता आरोपींनी रिक्षाचे आरसे खाली-वर केले तसेच फिर्यादीला मारहाण केली, चिंचवड येथील लक्ष्मी मेडिकल येथे शुक्रवारी (दि. १३) ही घटना घडली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
संजय नारायण जाधव (वय ४३, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पप्पू, सिद्धू, प्रेम आणि एक महिला आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड पोलीस अधिक तपास करत आहेत.