न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ ऑगस्ट २०२१) :- पिंपळे गुरवमधील जवळकरनगर येथे गुरुवारी (दि. १२) रोजी पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने कारवाई केली. हॉटेलमध्ये ग्राहकांना अवैधरित्या हुक्का पुरविणाऱ्या साहित्यासह दोघांना अटक केली.
स्वप्निल रविंद्र यादव (वय २६, रा. काटेपुरम, पिंपळे गुरव) व सागर रामचंद्र मांडजे (वय २३, रा. पिंपळे सौदागर) अशी अटक केलेल्या आरोपीची नवे आहेत. तर, सचिन परदेशीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.