न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जाने.) :- राष्ट्रवादीचे नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या उपस्थितीत महापौर राहुल जाधव यांनी आज गुरुवार (दि. १०) रोजी प्रभाग क्र. २८ मधील पिंपळे सौदागर-रहाटणी येथील विविध विकासकामांची पाहणी केली.
यावेळी ‘ड’ क्षेत्रीय विभागाचे विजय खरोटे, सहाय्यक उद्यान अधिक्षक पी. एम. गायकवाड, क्रीडा विभाग उपअभियंता गेंगजे, विद्युत विभागाचे उपभियंता गलगले, स्थापत्य उपभियंता डी. एन. गट्टूवार, स्थापत्य विभागाचे उप अभियंता सुनील पाटील, स्थापत्य विभागाचे कनिष्ठ अभियंता नरेश जाधव, नगररचना उपअभियंता बागवानी व आदी उपस्थित होते.
यावेळी नाना काटे यांनी प्रभागातील विकास कामांची माहिती महापौरांना दिली. तसेच प्रलंबित प्रश्नांकडेदेखील महापौरांचे लक्ष वेधले. या पाहणी दौऱ्यावेळी प्रभागातील रोझ आयकॉन शेजारील ‘प्ले ग्राउंड’, ४५ मीटर बीआरटीएस रोड वरील ‘लीनीयर गार्डन’, पिंपळे सौदागर गावातील व्यायामशाळा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे भाजी मंडई, गोविंद-यशदा चौकातील सब-वे, विविध बस स्टॉप, रोझलँड रेसिडेंसी शेजारील राजमाता जिजाऊ उद्यान तसेच उद्यानामधील पाण्याच्या टाकी व आदी कामांची महापौर राहुल जाधव यांनी पाहणी केली. पिंपळे सौदागर व परिसराचा स्मार्ट सिटीत समावेश झाला आहे. त्यामुळे उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे तसेच स्वच्छता ठेवण्याच्या सूचना महापौरांनी संबधित अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या आहेत.











