- एकाला अटक; भोसरी पोलिसांची कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ ऑगस्ट २०२१) :- मोशीत दुचाकीवर प्लॅस्टिकच्या पिशवीत सव्वा पाच लाखांचा २१ किलो गांजा घेऊन आरोपी थांबला आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. भोसरी पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.
त्याच्याकडून सव्वा पाच लाखांचा २१ किलो गांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई बुधवारी (दि. १८) रोजी मोशीतील ९० फुटी रस्त्यावर पोलसांनी केली. संजय सदाशिव मोहीते (वय ४०, रा. एकता कॉलनी, शास्त्री चौक, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण करीत आहेत.











