न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ ऑगस्ट २०२१) :- बिजलीनगर स्पाईन रस्त्यावर कडेला, चौकात विक्रेत्यांमुळे नेहमीच वाहतूककोंडी होत होती. महापालिकेने बिजलीनगर परिसरातील पथारी व्यावसायिकांसाठी रेल विहार सोयटीच्या मागील बाजूस असणाऱ्या सेवा रस्त्याच्या मोकळ्या जागेत हॉकर्स झोन तयार केला आहे.
नागरिकांना फेरीवाल्यांचा त्रास कमी व्हावा, म्हणून या परिसरातून फेरीवाले हटवण्याची मागणी मध्यंतरी झाली. त्यावर प्रशासनाने हॉकर्स झोन तयार करून नागरिकांना होणाऱ्या त्रासातून सुटका केली आहे.











