- ‘कोव्हॅक्सिन’चे २७०० डोसेस; KIOSK टोकनप्रणाली मिळणार २३०० डोसेस…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ ऑगस्ट २०२१) :- वय १८ वर्ष व त्या पुढील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे ८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यतच्या लाभार्थींना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कोविड लसीकरण केंद्रावर मंगळवारी (दि. २४) रोजी अ, ब, क, ड, इ, ह, फ या प्रभागवार पद्धतीने ‘कोव्हिशिल्ड’ लसीचा डोस देण्यात येणार आहे.
यातील पालिकेच्या केंद्रीय KIOSK टोकनप्रणाली व्दारे २३०० कोविड डोसेस तर, कोविन अॅपव्दारे – ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने ४६० डोसेस व उर्वरीत ८७४० डोसेस ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅपव्दारे लसीकरण केंद्रावर देण्यात येणार आहेत. यातील KIOSK मशिनद्वारे टोकन घेतलेल्या लाभार्थ्यांकडे लसीकरणाचा एस.एम.एस. आवश्यक आहे.
वय १८ वर्षावरील सर्व लाभार्थींना पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे ८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यतच्या लाभार्थ्यांना महापालिकेच्या कोविड-१९ लसीकरण केंद्रावर अ, ब, क, ड, इ, ह, फ या प्रभागवार पद्धतीने कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने ९० ‘कोव्हिशिल्ड’ लसीचे डोसेस तर, उर्वरीत लाभार्थ्यांना ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅपव्दारे २६१० ‘कोव्हिशिल्ड’ लसीचे डोसेस देण्यात येणार आहेत.
‘कोव्हॅक्सिन’ लसीचा वय १८ वर्ष व त्यावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्याना अ, ब, क, ड, इ, फ, ग, ह या प्रभागवार पद्धतीने पहिला डोस कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने ४५० डोसेस व उर्वरीत सर्वाना ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅपव्दारे ४५० कोविड डोसेस देण्यात येणार आहेत. दुसरा डोस हा कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने १८० डोसेस व उर्वरीत १६१० डोसेस ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप व्दारे लसीकरण केंद्रावर देण्यात येतील.
स्तनदा व गरोदर महिलांच्या कोविड-१९ लसीकरणासाठी केंद्रावर काही डोस राखीव ठेवण्यात येणार आहेत. त्यासाठी ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ऍप या पध्दतीने लसीकरण करण्यात येईल. सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या कालावधीत करण्यात येईल. कोविन अॅपवर नोंदणी करण्यासाठी (दि. २४) सकाळी ८.०० वाजता स्लॉट बुकींग करण्यासाठी ओपन करण्यात येतील. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर जेष्ठ नागरिक, दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थ्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल.











