ताथवडेतील ”स्पाईस तवा” आणि ”अपना अड्डा” फूडकोर्टची एक्सप्रेस वेवर धूम..
खवय्यांना कबाबसह तंदुरमधील विविध डिशेसची भुरळ..
आयटी पार्कसह रावेत-पुनावळेतील खवय्यांचा यथेच्छ भोजनावर ताव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ ऑगस्ट २०२१) :- एक्सप्रेस वे मार्गे मुंबईहून पुण्याकडे प्रवास करताना प्रवासात एक-दोन अपवाद वगळता इतरत्र अनेकांची फूडकोर्ट (FOOD COURT) अभावी कुचंबणा व्हायची. मात्र ”स्पाईस तवा” (Family Restaurant) आणि ”अपना अड्डा” (Bar & Restaurant) या फूडकोर्ट (FOOD COURT) च्या लॉन्चिंग (Launching) नंतर अनेकांची प्रतीक्षा संपली. मुंबईहुन शेकडो किलोमीटर अंतर कापून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना व हिंजवडी आयटी पार्कच्या खवय्यांना इथे अनोख्या स्टाइलने बनवलेल्या कबाबसह तंदुरमधील विविध डिशेसनी भुरळ घातली आहे.
ही अनोखी किमया आहे साधली आहे, प्रथितयश बांधकाम व्यवसायिक नितीन सोमाणी आणि युवा उद्योजक इरफान सय्यद यांनी. त्यांना जोड दिली आहे, हॉटेल व्यवसायातील दांडगा अनुभव व अभ्यासू दिनाकर शेट्टी व नितेश राजपुरोहित यांच्या सहयोगातून निर्माण झालेल्या ‘इशानी हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेसने. पाच मजल्यांचे हे हॉटेल पिंपरी चिंचवड शहरातून जाणाऱ्या पुणे-बॅंगलोर महामार्गावरील जेएसपीएम कॉलजनजीकच्या ताथवडेत थाटले असून, त्याला महामार्गावरील पर्यटकांसह, खवय्ये, प्रवासी यांची जोरदार पसंती मिळत आहे. त्यामुळे ते परिसरत एक अनोखे लँडमार्क ठरू पाहत आहे.
हॉटेल व्यवसायात सतत नवीन प्रयोग करत राहणाऱ्या टीमने रोल, मोमोज, फास्ट फुड, बार, आऊटलेट्स, व्हेज नॉनव्हेजमधील विविधता यांनी आपली प्रयोगशीलता कायम ठेवली आहे.
ताथवडेत परिसरात पंधरा हजार स्क्वेअर फूट जागेत उभारलेले तब्बल ५ मजली फूडकोर्ट (FOOD COURT) हे या महामार्गावरील आकर्षण ठरत आहे. येथे बारसाठी तसेच व्हेज ग्राहकांसाठीदेखील वेगळी सुविधा आहे. महाराष्ट्रीयन, पंजाबी, दक्षिण भारतीय, चायनीज वेस्टन डिशेसची भरमार असणाऱ्या या फूडकोर्ट (FOOD COURT) मध्ये बनविल्या जाणाऱ्या पदार्थांसाठी खास मसाल्यांचा वापर केला जातोय. त्यामुळे येथील जेवणाची चव खवय्यांच्या जिभेवर चांगलीच रेंगाळल्रेली आहे. इथे बनविल्या जाणाऱ्या तंदुरमधील डिशेसनाही ग्राहकांची जोरदार पसंती मिळतेय.
अनेक हटके हॉटेल्स तुम्ही पाहिले असतील. मात्र, इतर प्रांतांसह मराठी मातीची भुरळ घालणारी चव मात्र, इथेच अनुभवयाला मिळते. ‘शाही भोजनाचा बादशाही थाट’ अशी टॅगलाइन या फूडकोर्ट (FOOD COURT) ला नक्कीच साजेशी ठरते. खवय्यांनी एक क्षण का होईना इथे भेट देऊन परिपूर्ण क्षुधाशांतीची अनुभूती करून घ्यावी.












