- ‘शत प्रतिशत भाजप’साठी “सेवा पंधरवडा” व विविध अभियानांच्या माध्यमातून योजनांची जनजागृती..
- भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांची माहिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, (दि. 20 सप्टेंबर 2025) :- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) भाजपच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरात “सेवा पंधरवडा”, आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान व जीएसटी रिफॉर्म अभियान तसेच मोदी सरकारच्या विविध योजनांची जनजागृती करण्यात येणार आहे.
या विविध उपक्रमांची माहिती देण्यासाठी आज शनिवार (दि. 20) रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे, आमदार महेश लांडगे, आमदार अमित गोरखे तसेच भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
शत्रुघ्न (बापू) काटे म्हणाले, मोदी साहेबांनी विविध वस्तुंवरील जीएसटी कपातीबाबत चांगला निर्णय घेतला. त्यामुळे बहुतांशी जीवनावश्यक वस्तु स्वस्त झाल्या आहेत. शेतीविषयक साहित्यही स्वस्त झाले. सर्व सामान्यांना दिलासा मिळाला आहे. मेक ईन इंडीया, आत्मनिर्भर भारतमुळे लोकांची जीवनशैली आधुनिक होत आहे. पिंपरी-चिंचवड शहराच्या दृष्टिकोनातून मेट्रो विस्तारीकरणावर देखील भर दिला जात आहे. प्रधानमंत्री आवास योजनाच्या माध्यमातून परवडणारी घरं तयार होत आहेत.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात “सेवा पंधरवडा”, आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान व जीएसटी रिफॉर्म अभियान राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे, स्वच्छता मोहीम, अपंगांचा सन्मान, वृक्षारोपण, व्होकल फॉर लोकलचा प्रचार, मोदी विकास मॅरेथॉन, ‘विकसित भारत’, असे कार्यक्रम आयोजित केले आहेत.
“पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपसाठी कुठेही धोक्याची घंटा नाही. विकास योजना जनतेसमोर नेत आहोत. 32 प्रभागात शत प्रतिशत भाजपसाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. प्रभागात ताकदीचे उमेदवार आहेत. निवडणूक जवळ येताच पक्षात आणखी इनकमिंग वाढणार आहे.”
– शत्रुघ्न (बापू) काटे, भाजपा शहराध्यक्ष…













