न्यूज पीसीएमसी नेटवर्क
दापोडी (दि. १५ ऑक्टोबर २०२५) :- फुगेवाडी, दापोडी येथील एका युवकाला कर्ज मंजुरीचे आमिष दाखवून ऑनलाईन ₹३०,५९१/- रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.
या प्रकरणी दापोडी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी करण विशनसिंग राजपुरोहित (वय ३३, रा. फुगेवाडी, दापोडी) यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी यांना मोबाईल क्रमांक वरून किशोर पाटील नावाने संपर्क साधणाऱ्या व्यक्तीने “लोन मंजूर करून देतो” असे सांगून फसवणूक केली.
त्या व्यक्तीने फिर्यादींकडून लोनसाठी लागणारी कागदपत्रे मागवून त्यांच्याच नावाने आर.के. बन्सल फायनान्स कंपनीतून ₹२७,०००/- चे लोन त्यांच्या संमतीशिवाय घेतले. तसेच, ₹५ लाख कर्ज मंजुरीच्या नावाखाली ₹२३,८१४/- रुपयांची प्रोसेसिंग फी भरण्याचे प्रलोभन दाखवले.
ही फी एका अनोळखी QR स्कॅनरवर पाठवण्यास सांगून आरोपीने एकूण ₹३०,५९१/- रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. घटनेनंतर आरोपीने संपर्क तोडला असून त्याचा शोध सुरू आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.













