न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ ऑगस्ट २०२१) :- युवकांनी खेळाकडे जास्त प्रमाणात वळले पाहिजे. खेळ खेळत असताना कुठल्या प्रकारचे व्यसन न करता खेळाशी दोस्ती करावी. खेळाडूंनी आपल्या देशासाठी ऑलिम्पिकचे पद येण्यासाठी खूप खूप मेहनत घ्यावी, असे मनोगत पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर सुनिता वाडेकर यांनी व्यक्त केले.
कै. उल्हास साठे क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने क्रीडा दिनानिमित्त क्रीडा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या क्रीडा गौरव सन्मान देऊन गौरवण्यात येते. यावेळी वाडेकर बोलत होते.
कार्यक्रमामध्ये अमोल सहारे (पत्रकार), आशिष उबाळे (राष्ट्रीय खेळाडू), सदानंद साबळे (राष्ट्रीय कोच) यांचा सन्मान वाडेकर यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.












