- फिल्मी डायलाॅगसह कोयत्याचा व्हिडिओ इन्सटाग्रामवर; तरूण अटकेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ सप्टेंबर २०२१) :- ‘तूम कानून तोड रहे हो… पुरानी आदत है युवर ऑनर… वो तो बचपनसे कर रहा हूं…’, असे फिल्मी डायलाॅग असलेला कोयत्याचा तो व्हिडिओ इन्सटाग्राम सोशल मीडिया ॲपवरून व्हायरल केला. यातून दहशत निर्माण केली.
याबाबत पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने आरोपीला अटक करून त्याच्याकडून २०० रुपयांचा एक लोखंडी कोयता जप्त केला. मोशी – देहूगाव रस्त्यावर मोशी येथे बुधवारी (दि. १) दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. आकाश राजाराम भिसे (वय २४, रा. मोशी), असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.
गुंडा विरोधी पथकाचे पोलीस कर्मचारी गणेश शंकर मेदगे यांनी याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सहायक फौजदार दीपक रणसौर तपास करीत आहेत.












