- गुंतवणूक धारकांची वाढली धाकधूक; पोलीसात धाव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ सप्टेंबर २०२१) :- प्लॉट खरेदी करून देण्याचे आमिष दाखवून आरोपीने २०१९ सालापासून फिर्यादीकडून चार लाख रुपये, तसेच इतरांकडून म्हणजेच गुलाब नामदेव झारगड यांच्याकडून १० लाख एक हजार, शोभा राजू साळूंके यांच्याकडून १० लाख, दिलीप चव्हाण यांच्याकडून चार लाख, आनंद भास्कर वाघमारे यांच्याकडून सहा लाख ११ हजार, मंदार अप्पासाहेब क्षिरसागर यांच्याकडून २५ लाख, पृथ्वीनाथ प्रभूनाथ यांच्याकडून दोन लाख ५१ हजार रुपये, मोहम्मद साकूर यांच्याकडून १० लाख ५१ हजार घेतले व त्यांना प्लॉट घेऊन देण्याचे आश्वासन दिले.
प्लॉट घेऊन देत नसल्यामुळे पैसे दिलेल्या सर्वांनी आरोपीकडे पैसे परत देण्याचा तगादा लावला. व पोलिसात धाव घेतली. अचानक आरोपीला कोरोनाचा संसर्ग होऊन त्यातच त्याचा मृत्यू झाला. आरोपीसह इतर कोणी या पैशांचा वापर केला आहे का, त्याच्या बँक खात्यावर हे पैसे आहेत का, या प्रकारात त्यांच्याबरोबर कोणी सहभागी होते का, याचा तपास सुरू आहे. आरोपीने आणखी नागरिकांकडून पैसे घेतल्याची शक्यता आहे. त्यामुळे फसवणुकीचा आकडा वाढू शकतो, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक अजित काकडे यांनी दिली आहे.
मयूर ज्ञानेश्वर कुंभार (वय २८, रा. गणेशनगर, थेरगाव) यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. संजय मारोतराव फुलझले (वय ४४, रा. बाणेर रस्ता), असे मयत आरोपीचे नाव आहे.












