- आयुक्तांच्या नामफलकावर शाईफेक करीत वेळकाढूपणाचा केला निषेध…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ सप्टेंबर २०२१) :- प्रभागात सुरू असलेल्या रस्ते खोदाई प्रकरणासह काही समस्यांबाबत पालिका आयुक्त राजेश पाटील यांना भेटण्यासाठी कासारवाडी-दापोडी प्रभागाच्या भाजप नगरसेविका आशा शेंडगे या महिला कार्यकर्त्यांसमवेत आयुक्तांच्या दालनाबाहेर ताटकळत उभ्या होत्या.
त्यांच्या प्रभागात स्मार्ट सिटीची कामे सुरू करण्यास स्थानिक विरोध करत होते. नगरसेविका शेंडगे याचीही सहमती होती. त्यानंतरही आयुक्तांनी पोलीस बंदोबस्तात त्याच्या प्रभागात स्मार्ट सिटीची कामे सुरू केली. याबाबत आयुक्तांना भेटण्यासाठी त्या आल्या. मात्र, आयुक्त राजेश पाटील व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये महत्वाच्या बैठकीत व्यस्त होते. अखेर संतापून नगरसेविका शेंडगे यांनी आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर असलेल्या नाम फलकावर शाई फेक करत आयुक्तांचा निषेध व्यक्त केला.
काही क्षणातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आशा शेंडगे यांच्यासह दहा महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. ही घटना आज गुरुवारी (दि. ९) रोजी पालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर घडली.