- एकाला अटक; दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ सप्टेंबर २०२१) :- पिंपरी रेल्वे स्टेशन समोरील स्पा सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी (दि. २४) रोजी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास कारवाई करीत पीडित महिलांची सुटका केली.
पोलीस उपनिरीक्षक शितल गिरी यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राहूल जाधव, असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह समीर हरी राठोड (वय २१, रा. काळेवाडी फाटा) व एक महिलेच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक (गुन्हे) भोजराज मिसाळ तपास करीत आहेत.