- रावेतमधील घटना; चौघांकडून जेष्ठाची फसवणूक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ सप्टेंबर २०२१) :- रावेत येथील सेक्टर क्रमांक २६ येथील एका प्लॉटच्या विक्रीबद्दल फिर्यादीकडून आरोपींनी ५४ लाख रुपये घेतले असताना देखील ठरलेल्या मुदतीत फिर्यादी यांना प्लॉटचा ताबा दिला गेला नाही. लेखी करार न देता संबंधित प्लॉटची विकसन करण्यासाठी परस्पर विक्री करण्यात आली.
हा प्रकार ५ फेब्रुवारी २०१६ ते २४ सप्टेंबर २०२१ या दरम्यान घडला. गुलाबहुसेन अब्दुल रहमान (वय ७१, रा. साईनाथ नगर, निगडी) यांनी रावेत पोलीस चौकीत फिर्याद दिली आहे.
विजय येळवंडे, सागर भिमराव पवार (रा. कुरकुंभ, दौंड), गिरिधर गायकवाड (रा. काळभोर नगर, चिंचवड), कमलेश भटीचा (रा. औंध, पुणे) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावेत पोलीस तपास करीत आहेत.