- कोयते हवेत फिरवून परिसरात दहशत; चौघे अटकेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ सप्टेंबर २०२१) :- फिर्यादीचा मुलगा खुनाच्या गुन्ह्यात आरोपी आहे. मयत तरुणाच्या मित्रांनी आपसात संगनमत करून कोयते घेऊन फिर्यादीच्या घरावर घाव घातले. कोयते हवेत फिरवून जोरजोरात ओरडून शिवीगाळ केली तसेच परिसरात दहशत निर्माण केली.
फिर्यादी यांच्या कारची तोडफोड करून नुकसान केले. हा प्रकार शनिवारी (दि. २५) पहाटे पाटील चाळ, थेरगाव येथे घडली. नारायण साहेबराव गायकवाड (वय ५९, रा. पाटीलचाळ, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
करण जैस्वाल (वय २५, रा. गणेश नगर,थेरगाव), करन सोनवणे (वय २०, रा. १६ नंबर बस स्टॉप, थेरगाव), वैभव गायकवाड (वय २३, रा. जांबे, पुणे), समाधान परिहार (वय २१, रा. जांबे, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी चौघांना अटक केली असून याप्रकरणी वाकड पोलीस तपास करीत आहेत.