- पत्नी गंभीर जखमी; पतीचे पलायन, वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ सप्टेंबर २०२१) :- दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून आरोपीने राग मनात धरून पत्नीच्या डोक्यात तीन ते चार वेळा हातोडीने वार करीत तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. पत्नी गंभीर जखमी झाली आहे. घटनेनंतर आरोपी पळून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना गुरुवारी (दि. २३) रात्री इंद्रायणी नगर, सदगुरु कॉलनी, थेरगाव येथे घडली. सुनिता बाळासाहेब जाधव असे जखमी महिलेचे नाव आहे. महिलेच्या मुलीने रविवारी (दि. २६) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
बाळासाहेब किसन जाधव (रा. इंद्रायणी नगर, सद्गुरू कॉलनी, थेरगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.