- टोळीकडून घरगुती सिलेंडरमधून २ किलो गॅस काढला जायचा..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ सप्टेंबर २०२१) :- दापोडी येथील एकाच्या मोकळ्या जागेत आरोपी हा देगलूरकर गॅस एजन्सी, वंदना गॅस एजन्सी, कांकरिया गॅस एजन्सीचे घरगुती वापराचे गॅस सिलेंडर प्राप्त करून देत होता. तर, दुसरा आरोपी हा विविध हॉटेलला गॅस विक्री करत होता. अशा प्रकारे दोघांची अवैध गॅस विक्री जोरात सुरू होती. या प्रकरणाची माहिती सामाजिक सुरक्षा पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना माहिती मिळाली.
त्यानुसार, दापोडीतील मोकळ्या जागेत जाऊन तिथे छापा टाकला असता गॅस रिफलिंग केली जात असल्याच उजेडात आलं. या प्रकरणी चालक आणि मालक नागेंद्रपाल योगेंद्रपाल सिंह, छोटू श्रीभगवान बघेल या दोन आरोपींसह एकूण १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ६ लाख ९७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. देगलूरकर गॅस एजेंसी, वंदना गॅस एजन्सी, कांकरिया गॅस एजन्सी येथील घरगुती गॅस सिलेंडरमधून २ किलो गॅस काढून घेतला जात होता. परंतु, याचा सुगावा संबंधित गॅस चालक मालकांना आरोपीनी लागू दिला नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
घरी गॅस एजन्सीकडून गॅस वितरित होताना त्याचे वजन करून घ्यावे, जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही. टाळाटाळ केल्यास संबंधित एजन्सीला त्यांची तक्रार करा, असे आवाहन सामाजिक सुरक्षा पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डोंगरे यांनी केले आहे.