- सातबाऱ्यावर नोंद लावण्यासाठी केली होती लाचेची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ सप्टेंबर २०२१) :- मृत्युपत्राची व हक्कसोडपत्राची नोंद सातबारा सदरी लावण्यासाठी तक्रारदारांनी तलाठ्याकडे अर्ज केला होता. तलाठ्याने त्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडी अंती ३० हजार रुपये देण्याचे ठरले.
४१ वर्षीय तक्रारदारानी एसीबीकडे तक्रार दिली. एसीबीने सापळा लावून सोमवारी दुपारी ३० हजारांची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी (दि. २७) दुपारी च-होली येथे करण्यात आली. मारूती अंकुश पवार (वय ४१) असे रंगेहाथ पकडलेल्या तलाठ्याचे नाव आहे.