- टेनिस क्रिकेट संघटनेकडून यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ सप्टेंबर २०२१) :- महाराष्ट्र राज्य टेनिस क्रिकेट असोसिएशन आणि नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाचवी खुला गट राज्य अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेत पिंपरी – चिंचवड महिलांच्या संघाने तृतीय क्रमांक पटकवला. महिलांच्या कर्णधार पाटीलच्या मार्गदर्शनाखाली संघाने तृतीय क्रमांक मिळवला आहे.
अमिषा पाटील, माधुरी बनसोडे, अचला गावडे, श्वेता साळुखे यांनी उत्कृष्ट फलंदाजी केली. अनुजा मोरे, संचिता सोनावणे यांनी उत्तम गोलंदाजी केली. तसेच श्रद्धा आव्हाड, मधुरा बाफना, साक्षी महाजन, साक्षी सरदार, सिया सूर्गतशी यानी क्षेत्ररक्षण केले. या सर्व खेळाडूना क्रीडा शिक्षिका पार्वती बाकळे यांचे मार्गदर्शन लाभले.
महाराष्ट्रातील मुलींच्या आठ संघांनी या राज्य स्पर्धेत भाग घेतला होता. तसेच पिंपरी -चिंचवड मुलींच्या संघाने नाशिक, सिंधुदुर्ग ग्रामीण, सिंधुदुर्ग शहर या सर्व जिल्हांच्या संघांवर विजय मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला. या सर्व स्पर्धा २४ सप्टेंबर २०२१ ते २६ सप्टेंबर २०२१ रोजी तालुका क्रीडा संकुल, नाशिक येथे संपन्न झाल्या.
पिंपरी – चिंचवड टेनिस क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी मृदुला महाजन, तुषार हिंगे, सुनीता फडके, ऐश्वर्या साठे यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले. या सर्व स्पर्धा महाराष्ट्र राज्य टेनिस क्रिकेट महासचिव मीनाक्षी गिरी यांच्या देखरेखेखाली संपन्न झाल्या.