- दिवाळीत ८.३३ टक्के बोनस, २० हजार रुपये सानुग्रह अनुदान जाहीर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ सप्टेंबर २०२१) :- कोरोना संकटाच्या काळातील कर्मचाऱ्यांचे योगदान आणि शहराच्या विकासातील योगदान लक्षात घेता पिंपरी चिंचवड महापालिकेने यंदा दिवाळीसाठी कर्मचाऱ्यांना खुशखबर दिली आहे.
कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी ८.३३ टक्के बोनस आणि २० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती महापौर ढोरे वा पालिका आयुक्तांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपमहापौर हिराबाई घुले, स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, सरचिटणीस सुप्रिया सुरगुडे आदी उपस्थित होते.
पिंपरी – चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघ आणि पिंपरी – चिंचवड महापालिका यांच्यात पंचवार्षिक वेतन करार झाला होता. यावर्षी करार संपला. त्यामुळे नव्याने पाच वर्षांसाठी करार करण्यात आला. पुढील पाच वर्षे म्हणजेच २०२०-२१ ते २०२४-२५ पर्यंत हा करार असणार आहे.