- कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ सप्टेंबर २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पिंपरीतील संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात (वायसीएम) मुलांसाठी असलेल्या वॉर्डमध्ये एका खाटेवर तीन-तीन लहान मुले उपचार घेत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची देखील शक्यता वर्तविली जात आहे.
वायसीएम रुग्णालयात लहान मुलांवरील उपचारासाठी २ वॉर्ड आहेत. त्यामध्ये ६० ते ७० खाटा उपलब्ध आहेत. रुग्णालयात विविध आजारांवर उपचार करण्यात येतात. लहान मुलांना उपचारासाठी या दोन वॉर्डमध्येच ठेवले जाते. येथे ६० ते ७० खाटांची व्यवस्था आहे. मात्र, ही व्यवस्था अपुरी असल्याचे चित्र सध्या पाहण्यास मिळत आहे.
सध्या रुग्णालयात दररोज २० ते ३० गरोदर मातांचे सिझेरियन, नैसर्गिक प्रसुती आहे. त्यामुळे या वॉर्डमध्ये बालक लहान मुलांना उपचारासाठी ठेवले जाते. त्याशिवाय, लहान मुलांवरील विविध उपचार देखील येथील रुग्णालयात केले जात आहे. पर्यायाने, येथील वॉर्डमधील व्यवस्थेवर त्याचा अतिरिक्त ताण पडत आहे.