- स्वतःच्या स्वीय सहायकाची पक्ष कार्यालयात नेमणूक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ सप्टेंबर २०२१) :- राज्य शासन स्तरावर प्रलंबित प्रश्न, समस्या, तक्रारींची निवेदने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहायक विकास पाटील यांनी खराळवाडी, पिंपरी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात सोमवारी (दि.२७) स्वीकारली. पक्ष कार्यालयात शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी विकास पाटील यांचे स्वागत केले. यावेळी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, प्रवक्ते फजल शेख व पदाधिकारी उपस्थित होते.
शहरातील विविध स्तरावरील निरनिराळ्या प्रकाराची १४ निवेदने त्यांना ३ तासांच्या कालावधीत प्राप्त झाली. राज्य शासनाशी संबंधित विविध प्रश्न, समस्या व तक्रारीबाबत नागरिकांना मुंबई किंवा पुण्यात जावे लागते. नागरिकांचा हेलपाटा वाचवा म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खासगी स्वीय सहायक पिंपरी व पुणे येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात नागरिकांना दर सोमवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत भेटणार आहेत. त्याची सुरूवात सोमवारपासून झाली.
पवार यांचे खासगी स्वीय सहायक विकास पाटील हे उपस्थित होते. तीन तासांच्या कालावधीत त्यांना एकूण १४ निवेदने प्राप्त झाली. पिंपरी – चिंचवड महापालिकेतून निवृत्त झालेल्या सर्व जातीच्या सफाई कामगारांना अनुकंपा तत्वावर नोकरी मिळावी, निवृत्तीवेतन, शहरातील रस्ते आणि इतर प्रश्रांसंबंधित ती निवेदन आहेत. ती निवेदने उपमुख्यमंत्री पवार यांच्यापर्यंत पोहचवून त्यावर योग्य ती कार्यवाही केली जाणार आहे.