- एकाला अटक; दोन महिलांची सुटका…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ सप्टेंबर २०२१) :- पिंपळे गुरव येथील जावळकर कॉलनी येथे ‘स्पेशल इफेक्ट स्पा सेंटर’ मध्ये आरोपींनी दोन महिलांना जबरदस्तीने वेश्या व्यवसायासाठी आणले होते. त्या महिलांकडून आरोपी जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेत होते. त्यातून मिळालेल्या पैशांवर त्यांचा चरितार्थ चालवीत होते.
पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. दोन महिलांची सुटका करण्यात आली. गोपाल रमेश मिश्रा (वय ३३, रा. रामनगर, येरवडा, पुणे) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
या रॅकेटमधील एक महिला (वय २९, रा. हडपसर, पुणे) आणि जुबेर (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत आठ हजार ३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी सोमवारी सायंकाळी पावणे सहा वाजता कारवाई केली