- वंचित बहुजन आघाडीचं पिंपरीत केंद्र सरकारविरोधात आंदोलन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ सप्टेंबर २०२१) :- ओबीसींमध्ये जनजागृती व्हावी आणि केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी मंगळवारी (दि. २८ सप्टेंबर) पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
यावेळी महिला शहराध्यक्षा लताताई रोकडे, माजी नगरसेवक व शहर कार्याध्यक्ष अंकुश कानडी, शहर उपाध्यक्ष अशोक कदम, सुनिल गायकवाड, शहर महासचिव संतोष जोगदंड, राजन नायर, बाबूराव फुलमाळी, इमामभाई शेख, के.डी. वाघमारे, धनंजय कांबळे, किरण हिंगणे, सुनिता शिंदे, स्वाती सपकाळ आदी उपस्थित होते. आंदोलनानंतर तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेनुसार दिलेले आरक्षणाचे हक्क ओबीसींना मिळाले पाहिजेत. यासाठी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. यासाठी ओबीसींचा इम्पिरिकल डाटा सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यासाठी केंद्र सरकारने २४ सप्टेंबर रोजी प्रतिज्ञाव्दारे नकार दिला. २०११ च्या जनगणनेत ओबीसींची स्वतंत्र जनगणना करावी यासाठी भाजपाचे खासदार स्व. गोपीनाथ मुंडे यांनीही आंदोलन केले होते. आता केंद्रात भाजपाचे सरकार आहे तेही ओबीसींची जनगणना करण्यास स्पष्ट नकार देत आहे. अशी दुट्टपी भुमिका घेणा-या भाजपा आणि कॉंग्रेसला आगामी निवडणुकांमध्ये मते देऊ नयेत. आता ओबीसींना न्याय मिळवून देण्यासाठी ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात काम करणारा वंचित बहुजन आघाडी पक्ष सक्षम ठरु शकतो. ओबीसींनी भाजप – कॉंग्रेसला सत्तेतून खाली खेचून वंचित बहुजन आघाडीचा पर्याय निवडावा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले.