न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जाने.) :- पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या (एम. एच. १४ सी. एल १५९९) या चारचाकी वाहनास वाहतूक पोलिसांनी ट्रिपल सीट बसले म्हणून दंड ठोठावला आहे. वाहतूक विभागाकडून त्यांना २०० रुपडे दंड आकारण्यात आला आहे. परंतु, चारचाकी वाहनाला ट्रिपल सीट दंड कसा?
महापालिका आयुक्त यांच्या गाडीचा नंबर एम.एच- १४ सी. एल. १५९९ हा असून सारखाच नंबर एका दुचाकीचा आहे. या दुचाकीवरून काहीजण वाहतूक पोलिसांना सीरियल क्रमांकात डी.एल. च्याऐवजी चुकून सी. एल. लिहिले होते. त्यामुळेच आयुक्तांच्या गाडीला पावती फाडली गेली. हा सर्व प्रकार नजरचुकीने घडला असल्याची कबुली निगडी वाहतूक पोलीस निरीक्षक रवींद्र निंबाळकर यांनी दिली असून, ती चूक दुरुस्त करून घेतली जाईल, असे सांगितले आहे.











