- स्मार्ट सिटीच्या ‘स्मार्ट’ संचालकांची पंधरावी बैठक संपन्न…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० सप्टेंबर २०२१) :- पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडची संचालक मंडळाची पंधरावी बैठक आणि वार्षीक सर्वसाधारण सभा गुरुवार (दि.३०) रोजी दुपारी चिंचवड येथील स्मार्ट सिटीच्या ऑटो क्लस्टर येथील कार्यालयात आयोजीत करण्यात आली होती. कंपनीचे चेअरमन तथा अतिरीक्त राज्य सचिव नितीन करीर यांच्या अध्यक्षतेखाली बैठका घेण्यात आली.
यावेळी महापौर तथा संचालक उषा ढोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आयुक्त राजेश पाटील, सत्तारुढ पक्षनेता तथा संचालक नामदेव ढाके, विरोधी पक्षनेता तथा संचालक राजू मिसाळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, संचालक सचिन चिखले, सह मुख्य कार्यकारी अधिकारी (एबीटी) राजन पाटील, सह मुख्य कार्यकारी अधिकारी (पॅन सिटी) निळकंठ पोमण, मुख्य वित्तीय अधिकारी सुनिल भोसले, कपनी सचिव चित्रा गवार, सह शहर अभियंता अशोक भालकर आदी उपस्थित होते.
बैठकीच्या कार्यक्रमपत्रिकेवरील एकुण २६ विषयांपैकी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करुन निर्णय घेण्यात आला. यामध्ये माजी अध्यक्ष राजेंद्र जगताप, PMPML यांच्या जागी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची पीएमपीएमएलचे अध्यक्ष म्हणून नव्याने नियुक्ती झालेली असून PCSCL चे अधिकृत संचालक म्हणून त्यांच्या नावाला मंजूरी देण्यात आली. ३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी संचालक मंडळाच्या अहवालास मंजूरी देण्यात आली. आर्थिक वर्ष २०२१-२०२२ पुढील वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांच्या मंजुरीच्या अधीन राहून कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षक म्हणून में एमवेजीएन अँड असोसिएट्स, चार्टर्ड अकाउंटंट यांची नियुक्तीबाबत चर्चा करून मान्यता देण्यात आली.
आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत संचालक मंडळाच्या मान्यतेला अधीन राहून मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष प्रदीप कुमार भार्गव यांची तज्ज्ञ संचालक म्हणून नियुक्तीबाबत चर्चा करून त्यांच्या नावास मान्यता देण्यात आली. भार्गव हे सध्या इतर सहा कंपन्यांमध्ये महत्वाच्या पदावर कार्यरत आहेत. तसेच, आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत संचालक मंडळाच्या मान्यतेला अधीन राहून यशवंत श्रीपाद भावे यांची तज्ज्ञ संचालक म्हणून नियुक्तीबाबत चर्चा करून मंजूरी देण्यात आली. कंपनी अधिनियम २०१३ कलम १७७ ब तर्गत लेखापरीक्षण समितीच्या स्थापनेवर चर्चा होवून मंजूरी देण्यात आली. कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १७८ अंतर्गत नामांकन आणि मोबदला समितीच्या घटनेवर चर्चा करून मान्यता देण्यात आली.सीएमआर समितीमध्ये इच्छुक संचालकाच्या नियुक्तीबाबत चर्चा करण्यात आली.
स्मार्ट सिटी प्रोजेक्ट्स ( RFP2 आणि RFP3 ) च्या वेगळ्या निविदा प्रक्रियेद्वारे ” विविध स्मार्ट घटकांना वीज पुरवठा करण्यासाठी विद्युत पायाभूत सुविधा ” ” इलेक्ट्रिकल इन्फ्रास्ट्रगलर ” करण्यासाठी र.रु. १.७३ कोटी चर्चा करण्यात आली. मे. टेक महिंद्रा कंपनीच्या विनंतीनुसार, त्यांनी नमूद केलेले बदलाबाबत १४ व्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयावर चर्चा करून मुळ निविदेतील अटी व करारनाम्यानुसार गुणवत्तेबाबत कोणताही बदल न करणेचा निर्णय घेणेत आला. मे. KPMG सल्लागार यांची फक्त GIS Enable ERP चे कामकाजासाठी पुर्णवेळ ५ व २ तज्ज्ञ सल्लागार नेमणुकीबाबत निर्णय घेण्यात आला.
पिंपरी – चिंचवड शहरातील इंडिया सायकल 4 चेंज चलेंजसाठी टेनिकल कन्सल्टंट / एनाएमटी एक्सपर्टची नेमणूक आणि र.रु .२० लाख देयकांबाबत चर्चा करून मान्यता देण्यात आली. देवकर पार्क ते सांगवी एसटीपीपर्यंत वाढलेल्या इंटरसेप्टर सीवर लाईनबाबत चर्चा करून मंजूरी देण्यात आली. केंद्र शासनाच्या Cycle 4 Chalenge स्पर्धेत पिपरी चिंचवड महानगरपालिकेने सहभाग घेतलेला असून, त्यामध्ये पिंपरी चिंचवड शहराची पहिल्या फेरीमध्ये पहिल्या अकरा शहरांमध्ये निवड झाली आहे. सदर स्पर्धेमध्ये र.रु. १ कोटीचे बक्षिस प्राप्त झालेले आहेत. स्पर्धेदरम्यान नागरिकांनी सांगवी फाटा ते काळेवाडी फाटा या रस्त्यास प्रथम पसंती दिल्याने अंतिम निकालापूर्वी या रस्त्यावर सायकल ट्रॅक व पदपथ विकसित करणे आवश्यक आहे. सदरचे काम मर्यादीत कालावधीमध्ये पूर्ण करावयाचे असल्याने सदरचे काम स्मार्ट सिटी प्रकल्पा अंतर्गत ABD कार्यक्षेत्रात चालू असलेल्या निविदेतून करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासाठीचा लागणारा निधी र.रु. ४० कोटी महापालिकेमार्फत स्मार्ट सिटीकडे वर्ग केला जाणार आहे. या ऐनवेळच्या विषयाला बैठकीत मान्यता देण्यात आली.
















