- मोहननगरमधील घटना; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० सप्टेंबर २०२१) :- मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शिका या मंगळवारी रात्री त्यांची मुलगी आणि सहकारी अभिनेता असे तिघेजण कारमधून आकुर्डीतील ऐश्वर्या व्हेंचर सोसायटी येथे मानलेल्या भावाच्या घरी जेवणासाठी गेल्या होत्या.
जेवण केल्यानंतर त्या घरी जाण्यासाठी निघाल्या असता त्यांच्या कारच्या मागील बाजूची दरवाजाची काच फुटलेली दिसली. कारमधील पर्स अस्ताव्यस्त पडलेली होती. त्यांनी पर्स उघडून पाहिले असता पर्समधील ४ हजार ५०० रुपये नव्हते.
ही घटना बुधवारी (दि. २९) मध्यरात्री पावणे एकच्या सुमारास मोहननगर, चिंचवड येथे घडली. त्यांनी बुधवारी फिर्याद पिंपरी पोलीसात फिर्याद दिली. रेखा करण कुरील (वय ४३, रा. सुस रोड, मुळशी. मूळ रा. टिळक नगर, चेंबूर मुंबई) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस आणखी तपास करीत आहेत.
















