न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जाने.) :- निलेश (निलीमा) नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेसाहेब यांच्यावर केलेल्या बेताल वक्तव्याचा शिवशाही व्यापारी संघाच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी या ठिकाणी निदर्शने करून, मकरसंक्रातीच्या निमित्ताने बांगड्या, चुडा व पाटल्या कुरीअरने पाठविण्यात आल्या आहेत.
यावेळी शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले, प्रदेश सचिव गणेश आहेर, उपाध्यक्ष गोरख पाटील, नवनाथ माऊली जाधव, प्रदेश सदस्य मारूती म्हस्के, पिंंपरी विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, महिला अध्यक्षा तथा शिवसेना महिला विभाग संघटिका सारीका ताम्हचीकर, शिवसेना उपविभागप्रमुख सागर शिंदे, भिमराव कुलकर्णी आदी उपस्थित होते.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख शिवसेना नेते अदित्य ठाकरे यांच्यावर पुन्हा नारायण राणे व त्यांच्या मुलांनी बेताल वक्तव्य केल्यास शिवसेना स्टाईलने महिला भगिनींच्या हस्ते त्यांना बांगड्या व चुडा घालण्यात येईल. या कामी उदभवनाऱ्या गोष्टींची जबाबदारी राणे पिता-पुत्रावर राहील, असा इशारा शिवसेना संपर्कप्रमुख तथा शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले यांनी दिला आहे.











