- पतीकडून आरोपींवर चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ ऑक्टोबर २०२१) :- आरोपीने त्याचे नातेवाईक आणि मित्रांसोबत कट कारस्थान करून फिर्यादीच्या पत्नीला (वय २५) लग्न करण्याचे अमिष दाखवले. त्या उद्देशाने तिला फूस लावून पळवून नेले. त्यानंतर तिच्यावर ब्लेडने वार करून तिला गंभीर जखमी केले.
ही घटना २३ मे रोजी चिखली येथे घडली. पीडित विवाहितेच्या पतीने आरोपींवर न्यायालयात गुन्हा दाखल करून घेण्यासाठी पिंपरी न्यायालयात सीआरपीसी १५६ (३) प्रमाणे तक्रार दाखल केली. न्यायालयाने याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले आहेत.
त्यानुसार गुरुवारी सागर विजय उसर (वय २६), प्रवीण विजय उसर (वय २३ ), उमेश उसर, भागवत उसर (वय २६), गोपाळ मोरे, सिद्धू सोळंकी (वय २८), समाधान इंगळे (वय ३२ सर्व रा. चिखली) यांच्यावर चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.