- पिडीतेकडून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ ऑक्टोबर २०२१) :- हिंजवडी आयटी पार्क येथील एका कंपनीत सुरक्षारक्षक असलेल्या विवाहित महिलेला खाण्यातून गुंगीकारक पदार्थ देऊन तिच्यावर बलात्कार केला. तसेच तिचे विवस्त्र फोटो काढून धमकी दिली.
याप्रकरणी एका तरुणावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मारुंजी येथे २६ एप्रिल २०२० ते १४ जून २०२१ या कालावधीत ही घटना घडली. सौरभ संतोषकुमार श्रीवास्तव (वय २९, रा. गोरखपूर पूर्ण पत्ता माहिती नाही), असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत विवाहित महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.