- २५ ऑक्टोबरला अंतिम यादी तर, ३० ऑक्टोबरला निवडणूक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ ऑक्टोबर २०२१) :- पिंपरी -चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशनच्या निवडणुकीसाठी ३० ऑक्टोबरला सकाळी १० ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होणार आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, खजिनदार, हिशोब तपासणीस व कार्यकारणी सभासद या पदांकरिता निवडणूक होणार आहे.
नवीन सभासद नोंदणी करण्यात आली असून, १४ ऑक्टोबरला मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे. ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल.
येत्या १८ ते २० ऑक्टोबर दरम्यान उमेदवारी अर्ज वाटप व स्वीकृती, २१ ऑक्टोबरला उमेदवारी अर्जांची छाननी, २५ ऑक्टोबरला पात्र उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. २६ ऑक्टोबरला उमेदवारांचे मनोगत तर ३० ऑक्टोबरला मतदान, मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
















