- दोघांच्या विरोधात पिंपरी पोलिसात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ ऑक्टोबर २०२१) :- पॅसेंजरचा असल्याचा भासवून दोघेजण फिर्यादीच्या रिक्षात बसले. फिर्यादी रिक्षा चालवत असताना आरोपीने धारदार वस्तूने त्यांच्या पाठीवर व दंडावर मारले. यात फिर्यादी जखमी झाले.
हा प्रकार मंगळवारी (दि. ५) रात्री पावणे नऊच्या दरम्यान भाटनगर ते सर्वधर्मीय स्मशानभूमी, चिंचवड रस्त्यावर घडला. सचिन हनुमंत गायकवाड (वय ३८, रा. चापेकर चौक, वेताळ नगर झोपडपट्टी, चिंचवड) यांनी बुधवारी (दि. ६) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
संतोष सुभाष शिंदे (वय २०, रा. गांधी नगर, पिंपरी), नीलेश निकाळजे (रा. पत्राशेड, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार कुंभार तपास करीत आहेत.
















