- गेल्या दोन-तीन दिवसांपासून मृतदेह गाडीमध्येच पडून…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ ऑक्टोबर २०२१) :- थेरगावातील पदमजी पेपर मिलसमोर पार्क केलेल्या एका कारमध्ये आज गुरुवारी (दि. ७) सायंकाळी सहाच्या सुमारास एका ४४ वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आलेला आहे.
महेश लक्ष्मण पायगुडे ( रा. गोखले वृंदावन, राघवेंद्र मठाजवळ, थेरगाव) असे या मयत इसमाचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून इसमाचे नातेवाईक त्याचा शोध घेत होते. फोनद्वारे संपर्क होत नव्हता. या मयत इसमच्या मुलीचे चार महिन्यांपूर्वीच निधन झाले आहे.
मयत इसमाला दारूचे व्यसन असल्याची माहिती मयताच्या आईने पोलिसांना दिली. मयताचा मृतदेह गेल्या दोन-तीन दिवसांपासून गाडीमध्ये असल्यामुळे दुर्गंधी पसरली होती. अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.
















