- शहर राष्ट्रवादीकडून पिंपरीत केंद्र सरकार विरोधात निषेध आंदोलन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ ऑक्टोबर २०२१) :- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या कार्यालयात आणि घरी केंद्रीय आयकर विभागाने सूडबुद्धीने कारवाई केली आहे. याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहाराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात शुक्रवारी (दि. ८) रोजी सकाळी ११.३० वा. आंदोलन करण्यात आले.
केंद्र सरकारने केलेली ही कारवाई हेतुपरस्पर आहे, असा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला. आंदोलनात आ. बनसोडे, माजी आ. विलास लांडे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी महापौर योगेश बहल, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, स्वी. नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नगरसेवक अजित गव्हाणे तसेच राष्ट्रवादी शहर काँग्रेस पार्टीचे सर्व सेलचे पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात यावेळी उपस्थितांनी जोरदार घोषणाबाजी केली.
















