- भाजप शहराध्यक्ष महेश लांडगे, आ. जगतापांकडून जोरदार मोर्चेबांधणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ ऑक्टोबर २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक पाच महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीने विधानसभानिहाय बैठकांचा धडाका लावला आहे.
भोसरी, चिंचवड विधानसभा मतदारसंघाबरोबच पिंपरी विधानसभा मतदारसंघाकडेही भाजपचे शहराध्यक्ष आ. महेश लांडगे, माजी शहराध्यक्ष आ. लक्ष्मण जगताप यांनी लक्ष केंद्रित केले आहे.
भाजपने पिंपरी विधानसभा मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मोठ्या संख्येने नगरसेवक निवडून आणण्यासाठी ‘एक बूथ ३० यूथ’ हा उपक्रम हाती घेतला आहे. त्याअंतर्गत बूथ यंत्रणेसाठी लोक कसे जोडायचे? ३० ते ३५ हजार मतदारापर्यंत पक्षाने केलेली विकासकामे कशी पोचवायची? प्रत्येक हजार लोकांमागे ३० कार्यकत्यांचे जाळे कसे निर्माण करायचे? याबाबत आ. लांडगे व आ. जगताप यांनी मार्गदर्शन केले. बैठकीस नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
















