- कासारसाईत पाहणीसाठी गेले अनं धरणाच्या पाण्यात अडकून पडले…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ ऑक्टोबर २०२१) :- मावळातील कासारसाई धरणाच्या पाण्यात पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार मधोमध अडकले होते. तराफ्यावर बसून मत्स्य व्यवसायाची पाहणी करायला गेले असताना तराफ्याचे इंजिन अचानक बंद पडले.
चालकानं इंजिन सुरु करण्याचे प्रयत्न केला, पण ते सुरु होईना. शेवटी जवळच असलेली बोट बोलावण्यात आली. त्यानंतर अजित पवार दुसऱ्या बोटीत बसले आणि पुढचा प्रवास सुरु झाला.
तराफ्यावर बसून मत्स्य व्यवसायाची पाहणी करत असताना सकाळी ७ वाजता ही घटना घडली. गरजेपेक्षा जास्तीचे लोक त्यावर घेऊ नका, अशी सूचना केलेली असतानाही उपस्थितांनी तराफ्यावर गर्दी केली आणि तराफ्यावरचं वजन जास्त झाल्याने इंजिनवर ताण आला. त्यामुळे इंजिन बंद पडून तराफा मध्येच अडकला. यावेळी ‘इथलं पर्यटन म्हणजे भलतीच कसरत’ असा मिश्कील टोला पवारांनी लगावला.
















