- व्यवस्थापनाकडून राज्य सरकारचे कोरोनाविषयक निकष लागू…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ ऑक्टोबर २०२१) :- चिंचवडगावातील मोरया गोसावी मंदिरात व्यवस्थापनाने दर्शनासाठी राज्य सरकारचे कोरोनाविषयक निकष लागू केले आहेत. त्यात लहान मुले, जेष्ठ नागरिक, गरोदर महिलांना दर्शनासाठी प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
त्यात हातावरती सॅनिटायझर घेऊनच मंदिरात प्रवेश दिला जाईल. मास्क शिवाय मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. राज्य शासनाच्या सुचनेनुसार ज्येष्ठ नागरिक, लहान मुले व गरोदर महिलांना मंदिरात प्रवेश बंदी आहे. सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्स) ठेवुनच श्रींचे दर्शन घ्यावे. आजारी व्यक्तिंना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. मंदिर व मंदिर परिसरात धुम्रपान, थुंकल्यास अथवा मास्कचा वापर न केल्यास योग्य ती कार्यवाही केली जाईल. फुले हार नारळ, पेढे इ. मंदिरात आणु नये.
















