- तरीही विवाहितेचा सासरकडून छळ; अखेर विवाहितेची आत्महत्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ ऑक्टोबर २०२१) :- मुलीच्या लग्नात आरोपींच्या मागणीनुसार फिर्यादी यांनी १२५ तोळे सोने दिले. आरोपींना व्यवसाय करण्यासाठी फिर्यादीने नंतर ८३ लाख रुपये रोख स्वरूपात दिले. त्यानंतरही आरोपींनी फिर्यादी यांच्या मुलीला वारंवार पैशांच्या मागणीवरून शारीरिक व मानसिक त्रास दिला.
या त्रासाला कंटाळून फिर्यादी यांच्या मुलीने गुरुवारी (दि. ७) राहत्या घरी आत्महत्या केली. ही घटना २५ जानेवारी २०१५ ते ७ ऑक्टोबर २०२१ या दरम्यान मोशी प्राधिकरणात घडला.
मयत विवाहितेच्या वडिलांनी (वय ६४) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पती अखिल विपीन (वय ३३), सासू सुधा विपीन (वय ५३, दोघे रा. मोशी प्राधिकरण) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.
















