- अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ ऑक्टोबर २०२१) :- वाकड येथील काळाखडक परिसरात एका महिलेकडे पोलिसांना दोन किलो ७२२ ग्रॅम वजनाचा गांजा पोलिसांना आढळून आला. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई गुरुवारी (दि. ७) दुपारी सव्वाबारा दरम्यान केली.
या कारवाईत ६८ हजार ५० रुपयांचा गांजा जप्त केला. पोलीस शिपाई प्रसाद जंगीलवाड यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राधा बाळू फडतरे (वय ६२, रा. काळाखडक, वाकड) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. पोलीस शिपाई प्रसाद जंगीलवाड यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
















