- दापोडीत आरोपीकडून २८ वर्षीय महिलेचा विनयभंग अनं धमकी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ ऑक्टोबर २०२१) :- ‘ तुला काय करायचे ते कर, तुला सोडणार नाही’ अशी अश्लील शब्दात धमकी देत आरोपी फिर्यादीच्या घरात आला. त्यावेळी फिर्यादी महिलेची आई आणि एका व्यक्तीने आरोपीला समजावण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्या दोघांनाही शिवीगाळ करत मारहाण केली.
आरोपीच्या तावडीतून सोडविण्यासाठी फिर्यादी गेल्या असता आरोपीने महिलेशी गैरवर्तन करत त्यांचा विनयभंग केला. तसेच पाहून घेण्याची धमकी दिली. आरोपीने फिर्यादी महिलेचा पाठलाग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना बुधवारी रात्री दापोडीत सार्वजनिक ठिकाणी आणि गुरुवारी मध्यरात्री साडेबारा वाजता महिलेच्या घरी दापोडी येथे घडली.
२८ वर्षीय पीडित महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पिंटू ऊर्फ शंकर विठ्ठल शेंडगे (वय ३५, रा. फुलेनगर, दापोडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.