- एकजण गंभीर जखमी; पाच जण अटकेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ ऑक्टोबर २०२१) :- वाकड येथे सोमवारी (दि. ११) रात्री सव्वाआठच्या दरम्यान फिर्यादी काम करीत असलेल्या दुकानात जाऊन जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या दुकान मालकाला हाताने मारहाण केली.
दमदाटी करून त्यांच्या कानाखाली लावली. दुकानातील बॅटरी आणि सिमेंटचा गट्टू फिर्यादीच्या डोक्यात घालून गंभीर जखमी केले. फिर्यादीजवळील दोन हजार रोकड आणि मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला. दुकानातील मालाचे नुकसान केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
प्रतिक ज्ञानेश्वर सकपाळ (वय २५, रा. वाकड) यांनी मंगळवारी (दि. १२) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पिराजी धोंडीबा खंकरे, चंदन पवार, विशाल हाराळ व त्यांच्या दोन साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.