- पालिकेची सर्वसाधारण सभा नगरसेवकांच्या उपस्थितीत पार पडणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ ऑक्टोबर २०२१) :- कोरोनाची रुग्णसंख्या घटल्याने राज्य सरकारने पुन्हा महापालिकेची सर्वसाधारण सभा ऑफलाईन घेण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे तीन महिन्यानंतर सभा प्रत्यक्षात सभागृहातून होणार आहे.
ऑक्टोबर महिन्याची सर्वसाधारण सभा सभागृहातील आसन क्षमतेच्या पन्नास टक्क्यांप्रमाणे सदस्यांच्या उपस्थितीत होणार आहे. महापालिकेला राज्य सरकारचे पत्र पाच ऑक्टोबरला प्राप्त झाले. त्यामध्ये पन्नास टक्के क्षमतेने प्रत्यक्ष सर्वसाधारण सभा घेण्याचे आदेश दिले आहे.
सभागृहातून प्रत्यक्षात सर्वसाधारण सदस्य संख्या निश्चित करण्यात येणार आहे. उर्वरित नगरसेवक ऑनलाईन द्वारे सभा कामकाजात सहभागी होतील, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त तथा नगरसचिव उल्हास जगताप यांनी दिली.