- येत्या १० नोव्हेंबरला मतदान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ ऑक्टोबर २०२१) :- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) पुणे महानगर नियोजन समितीच्या ३० सदस्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे भोसरीतील नगरसेवक अजित गव्हाणे यांनी तर, सत्ताधारी भाजपकडून सभागृह नेते नामदेव ढाके, नगरसेवक चंद्रकांत नखाते, अभिषेक बारणे, वसंत बोराटे, संदीप कस्पटे, जयश्री गावडे, निर्मला गायकवाड यांनी अर्ज भरले आहेत.
मतदान दि. १० नोव्हेंबर २०२१ रोजी, तर मतमोजणी दि. १२ नोव्हेंबरला होणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
महानगर नियोजन समितीच्या निवडणुकीमध्ये पीएमआरडीएच्या हद्दीतल्या ग्रामीण (जिल्हा परिषद), लहान नागरी क्षेत्र (नगरपरिषद) आणि मोठे नागरी क्षेत्र (महानगपालिका) गटातून एकूण ९७८ मतदार आहेत. यामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत मिळून २८५ मतदार आहेत. सोबतच नगर परिषदांमध्ये ११४ तर ग्रामीण भागामध्ये ५७९ मतदार आहेत.