- आयुक्तांच्या धाडसी कारवाईबद्दल मनसेकडून पाठराखण..
- मनसे गटनेता सचिन चिखलेंकडून आयुक्तांना कौतुकपर पत्र…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क अॅड
पिंपरी (दि. १४ ऑक्टोबर २०२१) :- पिंपरी – चिंचवड शहरात अनधिकृत होर्डिंग्ज, फ्लेक्स लावणाऱ्यांमुळे बकालपणा वाढत होता. वारंवार तक्रारीही करण्यात येत होत्या. त्या तक्रारींची दखल घेत महापालिकेकडून शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज, फ्लेक्स लावणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत. त्यानुसार महापालिकेच्या आकाशचिन्ह परवाना विभागाच्या पथकाकडून अनेक बड्या होर्डिंग्ज, फ्लेक्स धारकांवर कारवाई जोमात सुरू आहे.
आयुक्तांच्या या धाडसी आदेशाचे शहर मनसेकडून जोरदार स्वागत करण्यात आले आहे. मनसेचे शहराध्यक्ष तथा गटनेते सचिन चिखले यांनी आयुक्त राजेश पाटील यांची भेट घेऊन त्यांना पत्र दिले. आयुक्तांच्या कामगिरीचे कौतुकही केले. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना गटनेता राहुल कलाटे हे देखील उपस्थित होते.
काय म्हटलंय पत्रात…
”पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा पदभार स्विकारल्यापासून आयुक्त हे अतिशय उत्कृष्ट काम करत आहेत. याचा अभिमान वाटतो. शहर स्मार्ट सिटीकडे झेपावत असताना शहर विकासाला बाधक ठरणा-या बेकायदेशीर होर्डिंग्ज, फ्लेक्स हटवण्याची मोहीम आपण हाती घेतली. अतिशय प्रभावीपणे काम होत आहे. आपण करत असलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आपले ‘मनसे’ अभिनंदन”.