- वाकडमधील प्रकार; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ ऑक्टोबर २०२१) :- अज्ञाताकडून ९६९२६८८४२६ / ९६९२६२५१२४ या मोबाईल क्रमांकाद्वारे फिर्यादीच्या मोबाईलवर इंग्रजीत मेसेज आला. एमटीएनएल कंपनीच्या सिमकार्डचे केवायसी करावे लागेल, असा तो मेसेज होता.
मेसेज पाहून फिर्यादीने अज्ञाताला फोन केला. अज्ञाताने गुगल प्ले स्टोअरवरून टीम व्हीवर क्विक सपोर्ट अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. फिर्यादीने अॅपद्वारे एमटीएनएलला १० रुपये पाठवले. त्यानंतर अचानक फिर्यादी व त्यांच्या कुटुंबियांच्या बँकेच्या चार खात्यांमधून ऑनलाईन सात लाख ५५ हजार ९९९ रुपये परस्पर काढले. आर्थिक फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले.
हा प्रकार २२ सप्टेंबर २०२१ दुपारी चारच्या दरम्यान वाकड येथे घडला. के. एस. नटराजन (वय ६७, रा. वाकड) यांनी बुधवारी (दि. १३) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वरील मोबाईल क्रमांक धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.